छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न प्रलंबित असून छगन भुजबळ यांनी वेळोवेळी हा प्रश्न करत आहेत. या संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी […]

छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न प्रलंबित असून छगन भुजबळ यांनी वेळोवेळी हा प्रश्न करत आहेत. या संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.

तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे.मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्यासाठी मंडल आयोगाने १९८० मध्ये केलेल्या शिफारशींनुसार देशात हा तिसरा मागासवर्ग अस्तित्वात आला. मात्र त्याला घटनात्मक संरक्षण पुरवताना दरवेळी जनगणना नसल्याने लोकसंख्या माहित नसल्याचे कारण पुढे येते. ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली. ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे, असे त्यांना वाटले. १८७१ ते १९३१ अशी साठ वर्षे हे काम नियमितपणे होत असे. १९४१ च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number