खा. छत्रपती उदयनराजे वापरतात ‘हा’ मोबाइल फोन!

खा. उदयनराजे भोसले हे नाव घेतलं की आपल्याला लगेच आठवते ती त्यांची रॉयल फॅमिली, त्यांचा राजेशाही थाट. उदयनराजेंचा वाहनं चालवण्याचा शौक तर जगजाहीर आहे. बाइक असो वा चारचाकी, उदयनराजे प्रत्येक वाहन चालवतात. काही दिवसांपुर्वी त्यांनी चक्क नगरपालिकेचा डंपर चालवतानाही ते दिसले होते. असा सगळा शाही थाट असणाऱ्या उदयन राजेंकडे मोबाइल कोणता असेल?   अॅपलचा लेटेस्ट […]

खा. छत्रपती उदयनराजे वापरतात ‘हा’ मोबाइल फोन!

खा. उदयनराजे भोसले हे नाव घेतलं की आपल्याला लगेच आठवते ती त्यांची रॉयल फॅमिली, त्यांचा राजेशाही थाट. उदयनराजेंचा वाहनं चालवण्याचा शौक तर जगजाहीर आहे. बाइक असो वा चारचाकी, उदयनराजे प्रत्येक वाहन चालवतात. काही दिवसांपुर्वी त्यांनी चक्क नगरपालिकेचा डंपर चालवतानाही ते दिसले होते. असा सगळा शाही थाट असणाऱ्या उदयन राजेंकडे मोबाइल कोणता असेल?

 

अॅपलचा लेटेस्ट आयफोन उदयनराजे वापरत असतील, असा तुमचा अंदाज असेल, तर तो साफ खोटा आहे. कारण अॅपल तर सोडाच, अॅण्ड्रोइड फोनचाही शौक नाही. छत्रपती उदयनराजे गेल्या 12 वर्षांपासून एकच फोन वापरतायत आणि तोही नोकिया E52. आपल्याला अॅण्ड्रोइड फोन्समधील अजिबात काही कळत नाही, असं उदयनराजेंनी स्वतःच सांगितलं. त्यामुळे स्मार्टफोन वापरत नाहीत. सोशल मीडियापासूनही ते दूरच राहातात.

 

आपल्याकडील मोबाइल फक्त ते कॉलिंगसाठी वापरतात. या फोनमध्ये इतर आधुनिक सुविधा नाहीत. या फोनला ते स्वतःच डबडा फोन म्हणतात. मात्र तरीही हाच फोन त्यांना आवडत असल्याने ते लेटेस्ट फोन वापरत नाहीत. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदयनराजे यांनी आपल्याकडील जुना फोन दाखवत आपण हाच फोन वापरत असल्यामुळे सोशल मीडियापासून लांबच असल्याचं स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number