Chembur School Bus Accident : चेंबूर स्कूल बस दुर्घटनेत महापालिकेचा मोठा निर्णय! दोन विभागांना क्लीन चिट, कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड, तर…

30 जून 2026 रोजी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडल्याप्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर केला असून झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदारा 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस केली आहे.

Chembur School Bus Accident : चेंबूर स्कूल बस दुर्घटनेत महापालिकेचा मोठा निर्णय! दोन विभागांना क्लीन चिट, कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड, तर…

चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडून झालेल्या दुर्घटने विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावेळी 30 जून 2026 रोजी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडल्याप्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर केला असून झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदारा 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. 

हेही वाचा- Pune News : पुण्यात महावितरणचा भोंगळ कारभार! अवघ्या 10 बाय 10 च्या खोलीला तब्बल 1 लाखाचं बिल; चूक की निष्काळजीपणा?

यावेळी उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळला नसल्याच अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसेच झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस केली आहे. त्याचसोबत कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला देखील 2 लाख रुपये दंड करण्याची शिफारस केली आहे. या दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असे देखील यात नमूद केले आहे.

यावेळी समितीने महापालिकेच्या विभागांना दोषी धरले नाही, मात्र कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागारावर दंडाची शिफारस करून झाडांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम व SOP तयार करण्यास सांगितले आहे. दरम्यान भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित जोखीम तपासणी, वैज्ञानिक छाटणी, उत्खननावेळी मुळांचे संरक्षण, वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती, झाडांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र SOP (मानक कार्यपद्धती) तयार करणे, अशा उपाययोजना सुचविल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number