शेफ विष्णू मनोहर यांनी शिजवली 3000 किलो ‘विश्वविक्रमी’ खिचडी!

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कढईत एकाच वेळी 3000 किलो खिचडी शिजवून एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. खिचडीला राष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता मिळावी, असा या विश्वविक्रम करण्यामागे त्यांचा होतून होता. ही खिचडी शिजवल्यानंतर नागपूरकरांमध्ये तिचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या विश्वविक्रमी खिचडीचा आस्वाद घेतला तसंच […]

शेफ विष्णू मनोहर यांनी शिजवली 3000 किलो ‘विश्वविक्रमी’ खिचडी!

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कढईत एकाच वेळी 3000 किलो खिचडी शिजवून एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. खिचडीला राष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता मिळावी, असा या विश्वविक्रम करण्यामागे त्यांचा होतून होता. ही खिचडी शिजवल्यानंतर नागपूरकरांमध्ये तिचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या विश्वविक्रमी खिचडीचा आस्वाद घेतला तसंच विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या.

 

कशी बनवली ही विश्वविक्रमी खिचडी?

 

तांदूळ- 275 किलो

मुंग डाळ- 125 किलो

हरभरा डाळ- 150 किलो

तूप- 100 किलो

पालेभाज्या- 100 किलो

दही- 50 किलो

 

यांसह इतर साहित्य घेऊन 3000 लिटर पाण्यात ही खिचडी शिजवण्यात आली.

 

ही खिचडी शिजायला मनोहर यांना 4 तास लागले.

 

3000 किलो खिचडीसाठी खास कढई!

 

3000 किलो खिचडी शिजवण्यासाठी 3 फूट खोलीची स्टीलची खास कढईदेखील तयार करण्यात आली.

या कढईचं वजन 510 किलो इतकं असून तिचा व्यास 10 फूट आहे.

ही कढई कोल्हापूरचे इंजिनिअर निलेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली.

खिचडी पूर्ण झाल्या निरीक्षक अरविंद पाटील यांनी विश्वविक्रम झाल्याची घोषणा केली.

यावेळी केंद्रीय नितीन गडकरी यांनी विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number