नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान शहीद

  वृत्तसंस्था, नवी दिल्ली   छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान शहीद झाले आहेत.   हे सर्व जवान सीआरपीएफच्या 74 बटालियनचे होते. सुकमातील नक्षलग्रस्त दक्षिण बस्तरमध्ये चिंतागुफाजवळच्या बुर्कापाल गावात आज दुपारी 12.25 च्या सुमरास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला.   नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जवान शहीद झाले तर आणखी 7 […]

नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान शहीद

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान शहीद झाले आहेत.

 

हे सर्व जवान सीआरपीएफच्या 74 बटालियनचे होते. सुकमातील नक्षलग्रस्त दक्षिण बस्तरमध्ये चिंतागुफाजवळच्या बुर्कापाल गावात आज दुपारी 12.25 च्या सुमरास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला.

 

नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जवान शहीद झाले तर आणखी 7 जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

रस्ता मोकळा करण्याच्या कामासाठी हे जवान तैनात होते. तेव्हा अचानक 300 नक्षल्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. एवढंच नाही तर जवानांची अत्याधुनिक शस्त्रही त्यांनी लांबवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number