चॅटर्जी – बॅनर्जी पुन्हा अटकेत

सध्याच्या काळात देशभरात ईडीने जोरदार कारवाई सुरु केलेली दिसते. महाराष्ट्रानंतर आता ईडी पश्चिम बंगालकडे वळली आहे. पश्चिम बंगालमधील ममता दीदींच्या सरकार मधील मंत्री पार्थ चॅटर्जी याना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यासोबतच चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या रोख रक्कमेसह सोनंही जप्त करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जी […]

चॅटर्जी – बॅनर्जी पुन्हा अटकेत

सध्याच्या काळात देशभरात ईडीने जोरदार कारवाई सुरु केलेली दिसते. महाराष्ट्रानंतर आता ईडी पश्चिम बंगालकडे वळली आहे. पश्चिम बंगालमधील ममता दीदींच्या सरकार मधील मंत्री पार्थ चॅटर्जी याना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यासोबतच चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या रोख रक्कमेसह सोनंही जप्त करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरु होती. चॅटर्जी यांच्या घरावरही ईडीने छापा मारला. पण त्यात फारसे काही सापडले नाही. मात्र चौकशीदरम्यान चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्या घरावरही ईडीने छापा मारला त्यात २० कोटीहून अधिक रक्कम आणि महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. यादरम्यान चॅटर्जी याना ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तसेच उत्पन्नाचे स्रोतही दाखवण्यात आले नाही. त्यानंतर त्याना अटक करण्यात आली.
पार्थ चॅटर्जी यांच्यावरील ईडी कारवाईचा थेट संबंध हा २०१६ मधील शिक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याशी आहे. या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पद्धतीने नापास उमेदवाराना प्रवेश देण्यात आले होते . त्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आला. यासाठी लाखो रुपयांची लाच घेण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात थेट शिक्षणमंत्र्याचाच सहभाग होता. यासाठी त्यांना अजून काही मंत्र्यांनचीही साथ होती. असेही ईडीच्या माहितीतून समोर आले आहे. यामुळे चॅटर्जीनंतर ममता सरकारमधील अजून काही मंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number