छात्र भारतीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली;विद्यार्थ्यांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. छात्र भारतीने गुरुवारी मुंबईत राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित केले आहे. […]

छात्र भारतीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली;विद्यार्थ्यांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणानंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून, या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. छात्र भारतीने गुरुवारी मुंबईत राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित केले आहे.

विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याला परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. असे असले, तरी कार्यक्रमाच्या आयोजनावर छात्र भारती ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं छात्र भारतीने म्हटले आहे. महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीनंतर राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद भाष्य कर णार होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number