अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आरोपपत्र दाखल

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई झाली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे […]

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आरोपपत्र दाखल

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई झाली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number