शिर्डी : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तसेच शिर्डीमध्ये ही भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्री ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. तर साई प्रसादालय हे सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत सुरु राहणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.
साईबाबांची शेजारती आणि पहाटे ४.३० वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. साईभक्तांनी होणारे बदल आणि कोव्हीड -१९ संदर्भातील नियमांचे पालन करुन साईबाबा संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.