‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य’; राज्यपालांचे सरकारला पत्र

विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुल्या पद्धतीने निवडणूक होण्यासाठी नियम बदलण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला असून आता मविआ सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष्याचा निवडणूकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी पत्रात […]

‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य’; राज्यपालांचे सरकारला पत्र

विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुल्या पद्धतीने निवडणूक होण्यासाठी नियम बदलण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला असून आता मविआ सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा अध्यक्ष्याचा निवडणूकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य आहे. अर्तात आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता उद्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत राज्यपालांना दोन पत्र लिहिली आहेत. मात्र दरवेळी राज्यपालांनी वेगवेगळी कारणे दिली. त्यानंतर आत मुख्यमंत्री तिसऱ्यांदा राज्यपालांना पत्र पाठवणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number