जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विरोधकांनी वीज बिल भरू नका, असे आवाहन करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधक शेतकऱ्यांना मुद्दाम भडकवत आहे असा आरोप ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.
शेतकऱ्यांकड़ून सक्तीची वीज बिल वसुली केली जातेय असा आरोप करत विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केलाय.
दरम्यान, राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन घेतल्यापासून बिलचं भरले नाहीयंत. तसेच या शेतकऱ्यांनी 3 हजार रुपये भरल्या वीज कनेक्शन पूर्ववत करू, अशी माहिती बावनकुळे यांनी दिलीय.