जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी ढोल वाजवण्याचा मोह अनावर झाला.
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत चंद्रकांत पाटलांनी ढोल वाजवला.
चंद्रकांत पाटील यांनी मनाच्या तुकाराम माळी गणेश मंडळाच्या मूर्तीची आरती केल्यानंतर या मिरवणुकीला सुरवात झाली.
या मिरवणुकीत पालखी खांद्यावर घेत चंद्रकांतदादा स्वतः सहभागी झाले होते.
तर, मिरवणुकीतील ढोल पथकाचा उत्साह पाहता दादांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.