चांद्रयान-२ लॅंडिंगसाठी उत्सुक; पंतप्रधान मोदींनी केले ट्विट

काही तासात चंद्रयान-२ चंद्रावर उतरणार असून हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण सामन्य भारतीयांसह वैज्ञानिकांसाठी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मी खूप उत्सुक असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी मिळून चंद्रयान-२ लँडिंग होताना बघा असेही म्हटलं आहे. काय म्हणाले पंतप्रधान मोदी चंद्रयान-२ लॅंडिंगबद्दल ? श्रीहरीकोट्टाच्या अंतराळकेंद्रावरून भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ने २२ जुलै २०१९ […]

चांद्रयान-२ लॅंडिंगसाठी उत्सुक; पंतप्रधान मोदींनी केले ट्विट
काही तासात चंद्रयान-२ चंद्रावर उतरणार असून हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण सामन्य भारतीयांसह वैज्ञानिकांसाठी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मी खूप उत्सुक असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी मिळून चंद्रयान-२ लँडिंग होताना बघा असेही म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी चंद्रयान-२ लॅंडिंगबद्दल ?

श्रीहरीकोट्टाच्या अंतराळकेंद्रावरून भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ने २२ जुलै २०१९ रोजी चंद्राकडे झेप घेतली.
७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोने दिली होती.
या महत्त्वाच्या क्षणाला काही तास शिल्लक असून लवकरच भारतासाठी हा मोठा विजय असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार असल्यामुळे उत्सुक असल्याचे ट्विट करत म्हटलं आहे.
वैज्ञानिकांसाठी हा ऐतिहासिक क्षण असून सगळेच खूप उत्सुक आहेत.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करा असेही मोदी म्हणाले.
फोटो शेअर केल्यानंतर मी स्वत: रिट्विट करेन असेही मोदी म्हणाले आहेत.
या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरुच्या इस्रो सेंटरमध्ये वैज्ञानिकांसोबत उपस्थित असणार असल्याचे मोदी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number