Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपचा विश्वास, राष्ट्रीय पातळीवर मिळाली नवी जबाबदारी

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपचा विश्वास, राष्ट्रीय पातळीवर मिळाली नवी जबाबदारी

Chandrashekhar Bawankule BJP new Appointment: राजकीय पटलावर एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादळ उठलेले असताना, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली असून, या नियुक्तीची अधिकृत घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. 

निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आणि संघटन कौशल्य
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने राज्यनिहाय अनुभवी नेत्यांची फळी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानसाठी माजी खासदार हरीश द्विवेदी यांच्याकडे मुख्य प्रभारीपद सोपवण्यात आले असून, त्यांच्या मदतीला चंद्रशेखर बावनकुळेंच्या साथीने एकूण 5 सहप्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळेंचा अनुभव आणि कामाची पद्धत लक्षात घेता ही निवड खालील मुद्द्यांवर आधारित मानली जात आहे: 
– महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी राज्यभर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली होती.
– स्थानिक निवडणुकांचे व्यवस्थापन, बूथ रचनेचा अनुभव आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात त्यांचा हातखंडा आहे.
– याआधी पक्षश्रेष्ठींनी मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी बावनकुळेंची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

हेही वाचा – Tukaram Mundhe FDA : ‘विमल’ची जाहिरात करणं पडलं महागात? शाहरुख खानसह, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत; कायदेशीर कारवाईची टांगती तलवार

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि जरांगेंची टीका
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कुणबी प्रमाणपत्रे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सातत्याने घणाघाती टीका करत आहेत. कुणबी दाखल्यांशी संबंधित निर्णयावरून जरांगे यांनी बावनकुळेंना लक्ष्य करत गंभीर आरोपही केले. महाराष्ट्रात अशा प्रकारचा तीव्र राजकीय विरोध सुरू असतानाच भाजप नेतृत्वाने बावनकुळेंवर राष्ट्रीय पातळीवर विश्वास दाखवून त्यांच्यावर राजस्थानसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. 

संघटनेची बांधणी आणि आगामी रणनीती
भाजपने आगामी निवडणुकांसाठी देशभर संघटनात्मक फेरबदल आणि व्यवस्थापन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या अनुभवाचा फायदा राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला होईल, या विचाराने दिल्लीतील श्रेष्ठींनी ही रणनीती आखली आहे. बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रालयाचा भार असतानाच, आता राजस्थानमधील स्थानिक पातळीवरील संघटनात्मक समीकरणांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा – Nalasopara Crime Cake Shop: नालासोपाऱ्यात 11 जणांना गंभीर विषबाधा! केक खाताना जे दिसलं त्याने सगळ्यांचीच खळबळ उडाली; नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number