आतापर्यंत वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जंगलात वाघाच्या हल्ल्यत १३ महिलांवर वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये चार महिलांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या तेंदु पत्ता हंगाम सुरु आहे, नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जंगलाचा आसरा आणि हिंस्त्र प्राण्याचा वेग यामुळे महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले. घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू पोहचली आहे.
अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्या महिला घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. पण, वाघाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला अन् या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचं समोर आलं आहे. कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय 45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय 46), संगीता संतोष चौधरी (वय 36) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (33) अशी मृतकांची नावे आहेत.
हेही वाचा – Farmers will Get Diesel: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, शेतीकामासाठी मिळणार डिझेल पण…; अटी लागू
द्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जंगलात थरकाप उडवणारी घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे. तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाचा हल्ला झाला. यामध्ये चौघींचाही मृत्यू झाला. दरम्याने घटना स्थळी वन कर्मचारी व पोलीस कर्मचारी दाखल, परिसरात ताणावाचे वातावरण आहे.