चंद्रपूर: लाचखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर चंद्रपुरामधून सध्या लाचखोर पोलिसांचा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडालीय. चंद्रपुर- नागपूर महामार्गावरील भद्रावती रस्त्यावर महामार्ग पोलिसांचे कार्यालय आहे. रस्ते सुरक्षा, अपघतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीची मदत देण्याचं काम या महामार्ग पोलिसांचे असतं. मात्र, ते सोडून हे पोलीस अवैध वसूली करीत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळतंय. रस्त्याच्या कडेला उभं राहून […]

चंद्रपूर: लाचखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चंद्रपुरामधून सध्या लाचखोर पोलिसांचा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडालीय. चंद्रपुर- नागपूर महामार्गावरील भद्रावती रस्त्यावर महामार्ग पोलिसांचे कार्यालय आहे. रस्ते सुरक्षा, अपघतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीची मदत देण्याचं काम या महामार्ग पोलिसांचे असतं. मात्र, ते सोडून हे पोलीस अवैध वसूली करीत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळतंय.

रस्त्याच्या कडेला उभं राहून जडवाहने थांबवून चालकाची कागदपत्रांच्या बदल्यात रोकड़ रक्कम घेतली जाते. जनतेचे पहारेकरीच अवैध रूपानं नागरिकांचे पैसे लुटत असल्याने पोलिसांची वर्दी मलिन होत चालली आहे. आता या लाचखोर पोलिसांवर कारवाई होणार का ? याकड़े सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number