शांत स्वभावाची ‘माया’ उग्र रूप धारण करते तेव्हा…

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूरजंगली श्वापदं म्हंटलं की शिकारी वृत्ती, आक्रमकता हे ओघानं आलच आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण तीच्या मायाळू स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचमुळे तिचा बछड्यांसोबतचा फोटो टपाल तिकिटावरही छापला गेला आहे. मात्र या समजुतीला तडा देणारा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. या व्हीडिओत तिच्या शिकारीचे काही क्षण पर्यटकांनी […]

शांत स्वभावाची ‘माया’ उग्र रूप धारण करते तेव्हा…

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर
जंगली श्वापदं म्हंटलं की शिकारी वृत्ती, आक्रमकता हे ओघानं आलच आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण तीच्या मायाळू स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचमुळे तिचा बछड्यांसोबतचा फोटो टपाल तिकिटावरही छापला गेला आहे. मात्र या समजुतीला तडा देणारा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय.

या व्हीडिओत तिच्या शिकारीचे काही क्षण पर्यटकांनी टिपलेत. प्रकल्पातील पांढरपौनी भागात तिनं शिकारीसाठी एका चितळाला टिपलं आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच चितळाला खाली लोळवलं. मायाळू म्हणून प्रसिद्ध असलेल्या माया वाघिणीचं हे शिकारी रूप पाहून पर्यटक सुध्दा थक्क झालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number