जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात कर्जमाफीतील यादीचा घोळ मिटता मिटत नसतांना एकाच आधार क्रमांकावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, या सर्वाला राष्ट्रीयकृत बँकाच जबाबदार असल्याच स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. सरकारने कर्जमाफीच्या सर्व रकमेची तरतूद केली आहे मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी एकच आधार क्रमांक हजारो शेतकऱ्यांच्या नावावर टाकून मोठा घोळ घातलाय. त्यामुळे मोठी तांत्रिक अडचण झाली आहे. मात्र, त्यावरही मात केली जाणार असल्याचं चंद्रकांत दादांनी म्हटलंय. त्यासाठी कोणत्याही आंदोलनाची गरज नसल्याचे नमूद करत या मुद्द्यावरून आंदोलनांच्या पवित्र्यात असलेल्यांना चंद्रकांत पाटलांनी फटकरलंय.