…म्हणून ‘त्यांनी’ माफी मागावी, महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

 जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर चंद्रकांत दाद पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महसूल, पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना त्यांचं कन्नड प्रेम भोवलंय असे आता म्हणावे लागेल. कारण चंद्रकांत पाटलांनी केलेल्या कन्नड भाषेच्या वक्तव्यामुळे सीमा भागात पुन्हा तणाव निर्माण झाला. चंद्रकांत दादांच्या वक्तव्याच्या विरोधात सीमावासीय कोल्हापुरात पोहोचले असून […]

…म्हणून ‘त्यांनी’ माफी मागावी, महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

 जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

चंद्रकांत दाद पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महसूल, पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना त्यांचं कन्नड प्रेम भोवलंय असे आता म्हणावे लागेल. कारण चंद्रकांत पाटलांनी केलेल्या कन्नड भाषेच्या वक्तव्यामुळे सीमा भागात पुन्हा तणाव निर्माण झाला.

चंद्रकांत दादांच्या वक्तव्याच्या विरोधात सीमावासीय कोल्हापुरात पोहोचले असून चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी धडक देण्यासाठी सीमावासीय आक्रमक झालेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर बंदोबस्त तैनात आहे. चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number