जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमधल्या दुर्गादेवी मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमात हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकु हे कन्नड गीत सादर करून उपस्थितांना खुश करण्याचा प्रयत्न केला.
जन्मले तर कर्नाटक मध्येच जन्मांवे असं हे गाणं आहे. मात्र, सीमावाद असतानाही बेळगावात मराठी भाषिक एकीनेच रहातच आहेत.
असे असतानाही भाषाभेद कसला करता सीमावाद असला तरी एकीने सौहार्दाने राहावं, असा सल्ला देणाऱ्या दादांनी आपण सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री आहोत याचे भान ठेवायला हवे होते, अशी तीव्र प्रतिक्रिया सीमावासियांनी दिलीय.