भंडा-याचे पालकमंत्रीपद भाजपकडे; चंद्रशेखर बावनकुळे होणार भंडा-याचे पालकमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडून काढून भाजपानं ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हे पद शिवसेनेचे दीपक सावंत यांच्याकडे होते. तर, बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री होते. यानिमित्ताने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले हे काँग्रेसमध्ये गेल्याने आता भंडारा-गोंदिया मतदारसंघात लवकरच […]

भंडा-याचे पालकमंत्रीपद भाजपकडे; चंद्रशेखर बावनकुळे होणार भंडा-याचे पालकमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडून काढून भाजपानं ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हे पद शिवसेनेचे दीपक सावंत यांच्याकडे होते. तर, बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री होते. यानिमित्ताने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले हे काँग्रेसमध्ये गेल्याने आता भंडारा-गोंदिया मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होईल. यादृष्टीने भाजपने ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले हे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवत आहेत. त्यांना ब्रेक लावण्यासाठी हा निर्णय घेतला असावा अशीही चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number