चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. तसेच आयोगाने परमबीर सिंह यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी […]

चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. तसेच आयोगाने परमबीर सिंह यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंह यांना जामीनपात्र वॉरंट जारी केला होता.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना समन्स बजावले होते. तरीही चैकशीला हजर न राहिल्यामुळे आयोगाने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावले होते.

सोमवारी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचा जामीनपात्र वॉरंट रद्द केला असून त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच यावेळी चांदीवाल आयोगासमोर जात असताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमनेसामने आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number