ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आता त्यांच्याजागी संदीप बक्शी यांची ICICI च्या सीईओ आणि एमडी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे चंदा कोचर अनिश्चितकालीन रजेवर होत्या.
चंदा कोचर यांच्या राजीनाम्याची बातमी येताच ICICI बँकेच्या शेअरचे भाव 3 टक्क्यांनी वाढले असून 313 रुपयांवर पोहचले आहेत.
काय आहे कर्ज प्रकरण?
- ICICI बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 साली 3250 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते.
- बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी हे कर्ज मंजूरही केले होते.
- मात्र 2016 साली ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे गुंतवणूकदार असलेले अरविंद गुप्ता यांनी एका पत्राद्वारे असा दावा केला होता की, चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हिडिओकॉन ग्रुपच्या मालकांशी व्यवसायिक संबंध आहेत.
- त्यामुळे ICICI बँकेने दिलेल्या या कर्जावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
- या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.