सिंधुदुर्गात पावसाची शक्यता

सिंधुदुर्गात १६ आणि १८ तारखेला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. ३० ते ४० किमी प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह पर्जन्यांची शक्यता मुख्यत्वे जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाट माथ्याकडून सुरुवात होऊन जिल्ह्याच्या अंतर्गत भागातही प्रभाव […]

सिंधुदुर्गात पावसाची शक्यता

सिंधुदुर्गात १६ आणि १८ तारखेला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. ३० ते ४० किमी प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह पर्जन्यांची शक्यता मुख्यत्वे जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाट माथ्याकडून सुरुवात होऊन जिल्ह्याच्या अंतर्गत भागातही प्रभाव असण्याची शक्यता आहे. या येणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू, सुरंगी, कोकम याच्या सह अन्य पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी ढगांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वाऱ्यासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number