जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ओखी वादळामुळे महामानवाच्या महापरिनिर्वाण निमित्त आलेल्या भीम अनुयायांची गैर सोय झालीय. दरम्यान शिवाजी पार्कात मंडप पडल्यानं काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
शिवाजी पार्कमध्ये अनुयायांसाठी पालिकेनं बांधला होता. मात्र, हा अचानक कोसळल्यानं तीन जखमी झालेत. या जखमी अनुयायांना सायन रुग्णालयात दाखल केलंय.
दरम्यान मुंबई महापालिकेनं आंबेडकरी अनुयायांची सुविधा केलीय. मात्र, पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायांनाचे प्रचंड हाल होताना दिसून येतंय. सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामध्ये अनुयायी उभे आहेत.
त्यामुळे महापालिकेनं प्रभादेवी-माहिम-दादर यापरिसरात अनुयायांना राहण्याची सुविधा केलीय.
दरम्यान, आबेडकरी अनुयायी शिवाजी पार्कवर आक्रमक झालेत.
चैत्युभूमी परिसरात आपत्कालीन परिस्थिती घोषित करून मदत करा अशी मागणी अनुयायांनी केली आहे.