जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती निवडणुकासाठी आपल्याला सोडण्याची मागणी केली
आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती छगन भुजबळांनी केली आहे.
PMLA कोर्टाकडे भुजबळांकडून ही विनंती करण्यात आली आहे. भुजबळांच्या विनंती अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
भुजबळांच्या मागणीवर ईडीने मात्र विरोध करण्यात आला आहे. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे.