जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळलाय. यापूर्वी ईडीनं भुजबळांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली होती. या प्रकरणात भुजबळांसोबत सामील अन्य साथीदारांची सुमारे 20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली.
ईडीने एकूण 178 कोटींची संपत्ती जप्त केली. छगन भुजबळ यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती, मनी लांड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मार्च, 2016 मध्ये अटक करण्यात आली. छगन भुजबळ मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, भुजबळांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र, भुजबळांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने आज भुजबळांच्या जामीन अर्जावर निर्णय देत, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.