जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना जामिन देण्याची मागणी केली आहे. छगन भुजबळ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीची चौकशी पूर्ण झाली असेल तर तसे त्यांनी कोर्टाला सांगाव आणि छगन भुजबळ यांना जामिन द्यावी.
छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असल्यामुळे त्यांना ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकवून जामीन दिला जात नाहीये, अशी ओबीसी जनतेत लोकभावना निर्माण झाल्याचंही प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे.