बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय अशी भिती का घालतात रुग्णालये?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डॉक्टरांच्या कट-प्रॅक्टिसविरुद्धचा लढा आता तीव्र होऊ लागलाय. डॉक्टरची पायरी चढली की विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरं जावं लागतं. हे तर नित्याचंच झालंय. प्रसूती शस्त्रक्रियेबाबतीतही हेच पाहायला मिळतंय. आजकाल सर्रास सिझरियन प्रसूती केली जाते. त्यासाठी मातेच्या, विशेषत: बाळाच्या जिवाला धोका असल्याचं कारण दिलं जाते. बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला […]

बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय अशी भिती का घालतात रुग्णालये?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डॉक्टरांच्या कट-प्रॅक्टिसविरुद्धचा लढा आता तीव्र होऊ लागलाय. डॉक्टरची पायरी चढली की विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरं जावं लागतं. हे तर नित्याचंच झालंय. प्रसूती शस्त्रक्रियेबाबतीतही हेच पाहायला मिळतंय.

आजकाल सर्रास सिझरियन प्रसूती केली जाते. त्यासाठी मातेच्या, विशेषत: बाळाच्या जिवाला धोका असल्याचं कारण दिलं जाते. बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय… अशी भीती घातली जाते आणि सिझरियन प्रसूती करण्याशिवाय पर्याय नाही, असं पटवून दिलं जातं. हे प्रामुख्यानं खासगी रुग्णालयांमध्ये होताना दिसतंय.

सिझेरियन प्रसूती करून सर्वसामान्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी शासनानं पावलं उचललीयत. आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून अशा पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीनं ही समिती शासनाला शिफारस करेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number