मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तसेच रेल्वे उशीराने आणि धिम्या गतीने असल्यामुळे अनेक प्रवासी रुळातून चालत निघाले आहेत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरल्यामुळे अपघात घडला. दरम्यान, रुळावरून घसरलेल्या तीन […]

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तसेच रेल्वे उशीराने आणि धिम्या गतीने असल्यामुळे अनेक प्रवासी रुळातून चालत निघाले आहेत.

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरल्यामुळे अपघात घडला. दरम्यान, रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरू होण्याचा अंदाज मध्य रेल्वेने वर्तवला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकांवरील जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

या एक्सप्रेस रेल्वे झाल्या रद्द

१२११० मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस

११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस

११००९ मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस

०२१०२ मनमाड-मुंबई समर स्पेशल

०२१०१ मुंबई-मनमाड समर स्पेशल

१२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

१२१२३ मुंबई-पुणे डेक्कन क्वीन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number