Central Railway: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल 20-30 मिनिटे उशिराने, 11 नंतर…

TRT ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. आज मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Central Railway: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल 20-30 मिनिटे उशिराने, 11 नंतर…

मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा अजूनही कायम असून मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. काल रात्री दादर ते मुलुंड स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकची तपासणी सुरू असताना TRT ट्रॉलीमध्ये अचानक बिघाड झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. TRT म्हणजे Track Recording Trolley असून रेल्वे मार्गाची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर-मुलुंडदरम्यान ट्रॅक तपासणी करत असताना या ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियोजन काही काळ विस्कळीत झाले. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांना स्लो मार्गावर वळवण्यात आले. त्याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला.

लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्याने स्लो लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. काल रात्री लोकल तब्बल 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. आजही परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नसून मध्य रेल्वेची वाहतूक साधारण 20 ते 30 मिनिटे विलंबाने सुरू आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विलंबामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना आपल्या नियोजित वेळेनुसार प्रवास करणे कठीण झाले आहे. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यातच आज दुपारी 11 वाजल्यानंतर मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आजच्या प्रवासावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कालच्या तांत्रिक बिघाडानंतर आधीच विस्कळीत झालेली सेवा आणि त्यात मेगा ब्लॉक यामुळे मुंबईकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number