जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यात भरीस भर म्हणून त्यातच पार्सिक बोगदा आणि कळवा येथे सिग्नल यंत्रणेच बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली.
त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाणे आणि दिव्यादरम्यान अप मार्गावरील लोकल सेवा काही वेळेसाठी विस्कळित झाली.
लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं कल्याण, डोंबिवली, दिवा आणि कळवा स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
आधीच मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होत असताना त्यांच्या त्रासाला पारावार उरला नाही. स्टेशनवर लोकल सेवा विस्कळीत असल्याची उद्घोषणाही दिली जात आहे.