नेहमी प्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कामांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक घेण्यात आला असून आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकपासून दिलासा मिळाला आहे.
शनिवारी रात्री पश्चिम मार्गावर वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता.
आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप धीमा मार्गावर नियोजित केला आहे.
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अर आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर हा ब्लॉक सकाळी 11.20 वाजेपासून दुपारी 3.50 पर्यंत असणार आहे.
तर हार्बर मार्गावर अप सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत आणि डाऊन मार्ग – सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत असणार आहे.
त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघून प्रवास करावा असे अवाहान रेल्वे प्रशासनाने केले आहे.