पृथ्वी शॉ वर शुभेच्छांचा वर्षाव

राजकोट कसोटीमध्ये पदार्पणातच मुंबईच्या पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातच शतकी खेळी खेळणारा पृथ्वी हा 15 वा भारतीय खेळाडू आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय कसोटीच्या पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर जमा झालाय.   पृथ्वी शॉच्या या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 154 बॉल्समध्ये 134 धावांची खेळी केली.   […]

पृथ्वी शॉ वर शुभेच्छांचा वर्षाव

राजकोट कसोटीमध्ये पदार्पणातच मुंबईच्या पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातच शतकी खेळी खेळणारा पृथ्वी हा 15 वा भारतीय खेळाडू आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय कसोटीच्या पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर जमा झालाय.

 

पृथ्वी शॉच्या या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 154 बॉल्समध्ये 134 धावांची खेळी केली.

 

पृथ्वीच्या या दमदार शतकामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईमध्ये त्याच्या घराजवळ चाहत्यांनी फटाके फोडून पृथ्वीचं शतक साजरं केलं. तर ट्वीटरवर आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आज शॉचा शो होता, असं गमतीत म्हटलंय. तसंच अभी तो बस शुरुआत है, लडके में बहोत दम है, असंही नमूद केलंय.

 

तर मोहम्मद कैफने पृथ्वी हा लंबी रेस का घोड आहे, असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

 

अभिनेता रितेश देशमुखनेही पृथ्वीचं अभिनंदन करताना ‘ही केम, ही सॉ अँड ही क्वाँकर्ड’ या इंग्रजी वाक्प्रचाराचा वापर करत ‘ही केम, ही ‘शॉ’ अँड ही क्वाँकर्ड असं ट्वीट केलंय.

 

 

शशी थरूर यांनी शॉ चा खेळ पाहून गावसकर, तेंडुलकर, सेहवागची आठवण येते असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. मात्र त्याचवेळी त्याच्या खेळाचं श्रेय त्यालाच देऊ, असंही म्हटलंय.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number