भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर तमिळनाडूमध्ये कोसळलं

देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करांचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे अधिकारी असून त्यांचे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे हॅलिकॉप्टर कुन्नूरमध्ये कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अधिकारी प्रवास करत असून बिपीन रावत त्यांच्य सहकुटुंबासह […]

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर तमिळनाडूमध्ये कोसळलं

देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करांचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे अधिकारी असून त्यांचे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे हॅलिकॉप्टर कुन्नूरमध्ये कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अधिकारी प्रवास करत असून बिपीन रावत त्यांच्य सहकुटुंबासह प्रवास करत असल्याचे माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर अपघातग्रस्त ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ६ पेकी ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

सीडीएस बिपिन रावत पत्नीसह वेलिंग्टनमध्ये कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर तेथून ते कुन्नूरला परतत होते. मात्र दरम्यान त्यांचे हॅलिकॉप्टर कुन्नूरच्या घनदाट जंगलात कोसळले असून आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number