मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यावरून राज्यात अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. तसेच मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र, मशिदीत का नाही?, असा सवालही नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
यावर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी सरकारचा विरोध नाही. धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट केले की, ‘सर्व मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, परंतु मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.’ अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. — Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2022