दहावीचा निकाल जाहीर…यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपली आहे. दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रखर मित्तल, रिमझिम अगरवाल देशात पहिले आले आहेत. […]

दहावीचा निकाल जाहीर…यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपली आहे. दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेत प्रखर मित्तल, रिमझिम अगरवाल देशात पहिले आले आहेत. त्याबरोबर नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी सुद्धा देशात पहिले आलेत. यावर्षी चौघांनी पहिला क्रमांक पटकावलाय. त्यांना 500पैकी 499 मार्कस मिळालेत. तर दिव्यांग श्रेणीत गुडगावची अनुष्का पांडा देशात पहिली आली आहे.

या परीक्षेत देशभरात 88.67 % मुली उत्तीर्ण झाल्या असून यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर 85.32 टक्के मुलं देशात उत्तीर्ण झाली आहेत.

सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number