CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियमात होणार मोठे बदल

नवीन दोन बोर्ड परीक्षांच्या धोरणानुसार, आता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

CBSE Board Exam 2026: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियमात होणार मोठे बदल

CBSE Board Exam 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या धोरणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नवीन दोन बोर्ड परीक्षांच्या धोरणानुसार, आता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत किमान 3 विषयांमध्ये बसणार नाहीत, त्यांना थेट "अनिवार्य पुनरावृत्ती" (Essential Repeat) श्रेणीत टाकले जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती cbse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परीक्षा आणि पात्रतेचे नवीन निकष
बोर्डाने जारी केलेल्या सूचनेनुसार, पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा या विषयांमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची (Improvement) संधी दिली जाईल. मात्र, जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेत 3 किंवा त्याहून अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला, तर त्याला त्याच वर्षी होणाऱ्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेलाच बसावे लागेल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत 'कंपार्टमेंट' निकाल मिळेल, त्यांना दुसऱ्या परीक्षेत बसण्याची सवलत दिली जाईल.

अतिरिक्त विषय आणि सुधारणा श्रेणीचे नियम
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वतंत्र किंवा अतिरिक्त विषयाची निवड करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दुसऱ्या परीक्षेसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:

3 मुख्य विषयांपर्यंत सुधारणा (Improvement) श्रेणी.
प्रथम किंवा तिसरी संधी अंतर्गत कंपार्टमेंट परीक्षा.
कंपार्टमेंट आणि सुधारणा या दोन्ही श्रेणींचा समावेश.
विषय बदलून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारणा संधी

हेही वाचा – Free School Bags: जीआर निघाला; दप्तर, पुस्तकं, जेवणाचा खर्चही सरकारच्या खांद्यावर, नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शैक्षणिक साहित्य

अनुपस्थित राहिल्यास कठोर कारवाई
जर एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव पहिल्या मुख्य परीक्षेतील 3 किंवा त्याहून अधिक विषयांना उपस्थित राहू शकला नाही, तर बोर्डाच्या धोरणानुसार त्याला दुसऱ्या बोर्ड परीक्षेत बसता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी त्यांना पहिल्या परीक्षेत बसणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी ही अधिकृत सूचना पाहण्यासाठी सीबीएसईच्या होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number