जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परिक्षा संपल्यानतंर विद्यार्थ्यांना उत्सुकता असते ती त्यांच्या निकालाची, कारण परिक्षा दिल्यानंतर विद्यार्थी सज्ज होतात आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आज त्यांची निकालाची ही प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसईचे १२वीचे निकाल आज जाहीर होणार आहेत.
निकाल पाहण्यासाठी सीबीएसईचं संकेतस्थळ, विविध अॅप्स आणि एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. मात्र परीक्षा मंडळानं निकालाची निश्चित वेळ अद्याप जाहीर केलीली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळपासूनच वेबसाईट आणि अॅप सारख्या चेक कराव्या लागणार आहेत. CBSE.in आणि CBSEresults.nic.in या संकेतस्थळांवर तुम्ही तुमचे निकाल पाहु शकता.