समीर वानखेडेंवर सीबीआयची कारवाई

चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात चर्चेत असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या मुंबईच्या घरात सीबीआयचा छापा पडला आहे. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडेंविरुद्ध आर्यन खान प्रकरणात एनसीबीने दक्षता तपास केला होता. हा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर […]

समीर वानखेडेंवर सीबीआयची कारवाई

चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात चर्चेत असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या मुंबईच्या घरात सीबीआयचा छापा पडला आहे. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

समीर वानखेडेंविरुद्ध आर्यन खान प्रकरणात एनसीबीने दक्षता तपास केला होता. हा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यासोबतच वानखेडेंवर शाहरुख खानच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची मागणी करून त्यातून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मिळून शाहरुख खानच्या जवळच्या लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनसीबीनेच या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यानुसार समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशीदेखील झाली. तीन आयआरएस अधिकाऱ्यांनी आर्यन खान विरोधात चार्ज लावले जाऊ नये यासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी १२ मे २०२३ रोजी सीबीआयने कानपूर, रांची आणि दिल्लीत छापेमारी केली. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

ज्यावेळी एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक असताना समीर वानखेडे यांच्यावर एनसीबीनं चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात मोठी मोहीम चालवली होती. त्यावेळी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईपासून सुरक्षा मिळण्याची मागणी याचिकेतून न्यायालयाकडे केली होती. परंतु, वानखेडेंची ही मागणी न्यायालयाने नाकारली.

समिर वानखेडेंनी याचिकेत काय म्हटले?
माझ्यावर बेहिशेबी संपत्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मला अटक होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. माझ्या मालमत्तेची तपासणी होऊ शकते. तशी सूचना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) केली आहे. या कारवाईपासून मला संरक्षण द्यावे, अशी मागणी वानखेडे यांनी आपल्या याचिकेत केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number