कास्टिंग काऊचचं महाभारत

जय महाराष्ट्र न्युज  कास्टिंग काऊचचं वादळ आता सिनेक्षेत्रातून राजकीय क्षेत्रातही गेलंय की काय असा सवाल विचारला जातोय. कारण काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतंच त्यापासून संसदही सुटलेली नाही असा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. याआधीही देशातील बलात्काराच्या घटनांवरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी बलात्कारावरून वादग्रस्त विधान केले होते. बलात्कार […]

कास्टिंग काऊचचं महाभारत

जय महाराष्ट्र न्युज 

कास्टिंग काऊचचं वादळ आता सिनेक्षेत्रातून राजकीय क्षेत्रातही गेलंय की काय असा सवाल विचारला जातोय. कारण काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतंच त्यापासून संसदही सुटलेली नाही असा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. याआधीही देशातील बलात्काराच्या घटनांवरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी बलात्कारावरून वादग्रस्त विधान केले होते. बलात्कार आणि कास्टिंग काऊच नंतर बॉलिवूडमध्ये रोजगार मिळतो, असं धक्कादायक विधान कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेलं असतानाच काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनीही धक्कादायक वक्तव्य केलं. 

सरोज खान यांचं समर्थन करताना रेणुका चौधरी यांनी हे धक्कादायक विधान केलं. संसद आणि इतर काही कामाची ठिकाणं यापासून सुटलीत असं काही समजू नका, असं सांगतानाच ‘मी-टू’ म्हणत आवाज उठविण्याची हिच वेळ आहे. प्रत्येकाने त्यावर बोललं पाहिजे. आपण भारतीय आता बिनधास्तपणे पुढं येत असून आपल्याबाबत काय घडलं हे सांगत आहोत,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, चौधरी यांच्या या धक्कादायक विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. याआधी फिल्म इंड्रस्टीमधला कास्टिंग काऊचचं महाभारत अनेकदा उघडकीस आलं होतं. मात्र आता अभिनेत्यांसोबत नेतेही कास्टिंग काऊचच्या विळख्यात सापडले आहेत असं चित्र समोर आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number