Homeमहाराष्ट्र फेरीवाले हटाव आंदोलनातील मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
फेरीवाले हटाव आंदोलनातील मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई नवी मुंबईच्या वाशी स्थानकाबाहेर फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवारी मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंवर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेनं खळ्ळ खट्याकला सुरुवात केली. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पसार झालेत. नवी मुंबईच्या वाशी स्थानकाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला होता. त्यावेळी स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांनी लावलेले बेकायदा […]
नवी मुंबईच्या वाशी स्थानकाबाहेर फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवारी मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंवर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेनं खळ्ळ खट्याकला सुरुवात केली. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पसार झालेत. नवी मुंबईच्या वाशी स्थानकाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला होता. त्यावेळी स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांनी लावलेले बेकायदा स्टॉल हटवण्यात आले होतं. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.