जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी भाजप नेते ऍड. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती घटनेच्या खऱ्या मास्टरमाईंड पालकमंत्री यशोमती ठाकूर या आहेत, असा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केल होता. त्यामुळे काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता बोंडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काँग्रेसचे हरिभाऊ मोहोडे यांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची आणि शासनाची बदनामी झाली आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, हरिभाऊ मोहोडे यांनी केली. याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीमधील अचलपूर शहरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने काढण्यात आली. यावेळी अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केला. तसेच यशोमती ठाकूर अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला. तसेच अमरावतीमध्ये होत असलेल्या दंगलींना एकमेव काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे.
दरम्यान, यशोमती ठाकूर म्हणाल्या, अनिल बोंडे वैफल्यग्रस्त अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.