नेहा देसाईंच्या तक्रारीनंतर ५ जणांवर गुन्हा

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. देसाईंच्या मृत्यूप्रकरणी आता ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नीने […]

नेहा देसाईंच्या तक्रारीनंतर ५ जणांवर गुन्हा

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. देसाईंच्या मृत्यूप्रकरणी आता ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नीने रायगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रार दिली आहे. ‘ECL फायनांन्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून खालापूर पोलिस ठाण्यात २६९/२०२३ भादवि ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी आणि इतर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापूर विभाग हे करीत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या कंपनीवर कर्ज होतं. नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने एडलवाईस एआरसीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती, असं एडलवाईस एआरसीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number