जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या कारमधून पाच जन प्रवास करत होते. त्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं कारच्या अवस्थेवरून समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिमहून पालघरकडे जात असताना पहाटे चारच्या सुमारास या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात चालकासह कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

किरण परशुराम पागधरे (वय 30 वर्षे) रा.वडराई, निकेश मोहन तामोरे(वय 29)रा.तारापूर, संतोष बळीराम रा.खानपाडा-पालघर, लदिपेश पागधरे रा.सातपाटी, विराज अर्जुन वेताळ रा.पालघर अशी या पाचही मृतांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यातील पाचांपैकी तीन मृतांची ओळख पटविण्यात यश आल आहे. तर, उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरु आहे. किरण पागधरे, निकेश तामोरे, विराज अरेकर, असं या तिघांच नाव असून अजून दोघांची माहिती अद्यापही पटली नसून हे तिघेही तारापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समजते आहे.