जय महाराष्ट्र न्यूज,वेब टीम
सध्या टॅटु काढण्याची क्रेझ जरा जास्तच वाढली आहे.शरिरावर निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे टॅटु काढलेली अनेक माणसं आपल्याला दररोज पहायला मिळतात.
मात्र टॅटुचं हे वेड एका मर्यादेपर्यंतच ठिक आहे. त्याची सीमा ओलांडली तर ते जीवावरही बेतु शकतं.
हल्लीच असाच एक प्रकार उघडकीस आलाय. 24 वर्षिय कॅनडी मॉडेल कॅट गॅलिंगर हिलादेखिल टॅटुचं असंच वेड आहे.
त्यामुळे तिने आपल्या अंगावर अनेक ठिकाणी असेच टॅटु बनवुन घेतले आहेत.
तिच्या शरिरावर मोजुन 25 टॅटुज कोरलेले आहेत. कॅटचं टॅटुचं हे वेड इतकं वाढलं कि, तिने चक्क डोळ्यांमध्ये टॅटु काढुन घेतला.
तिच्या डोळ्यांच्या बुबुळांचा रंग हिरवा असल्यानं उर्वरीत पांढऱ्या भागाला साजेसा वाटेल असा जांभळा रंग करण्यासाठी तिने जांभळ्या रंगाचा टॅटु बनवुन घेतला.
मात्र टॅटु बनवताना टॅटु आर्टिस्टकडुन चुक झाल्याने तिच्या दृष्टिवर त्याचा वाईट परिणाम झाला.
या टॅटुचा तिच्या डोळ्यांना इतका त्रास झाला कि, टॅटु बनवताना वापरलेली जांभळी इंक डोळ्यातुन बाहेर येऊ लागली आणि तिच्या डोळ्यांची सुज वाढु लागली.
वाढत्या त्रासामुळे कॅटने आय स्पेशालिस्टचा सल्ला घेतला.तेव्हा तिला डोळे खराब झाल्याचं समजलं.
टॅटुचं हे वेड किती महागात पडु शकतं याची प्रचिती आल्यावर तिने हि गोष्ट सोशल मिडियावर शेअर करुन इतरांना टॅटुच्या या वेडापासुन सावध राहण्याचा सल्ला दिलाय.