कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पाठवलं आहे. फडणवीस यांच्यासोबतच तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष तपासण्याचीही मागणी केली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने ५ जून रोजी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगानं प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावलं होतं. पण ५ जूनला पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकत नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयोगाला एक पत्रच पाठवले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, जानेवारी २०१८ साली कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील ५ जून ला साक्ष नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकत नसल्याचे आयोगाला कळवले आहे. तसेच आपली साक्ष नोंदवण्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी मिळावी, अशा मागणीचे पत्र देखील त्यांनी पाठवले आहे.
त्यांच्या या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे. “प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कुणाला बोलवावं आणि कुणाला बोलवू नये. याची आंबेडकर यांनी चांगली माहिती आहे. पण राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्साठी त्यांनी अशी मागणी केली असावी, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. यापूर्वीही लोकांनी अर्ज केले होते. पण आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता,तो त्यांनी घेतला आहे.