Palghar News : पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घातला

पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पालघर पोलिसांचा छापा पडला आहे. पालघरच्या सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छाप पडला आहे.

Palghar News : पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घातला

पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पालघर पोलिसांचा छापा पडला आहे. पालघरच्या सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छाप पडला आहे. कारवाईत पाच आरोपींसह लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अमेरिकेतील नागरिकांना फोन करून स्वतःला बँक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत, त्यांच्याकडून त्यांची वैयक्तीक आर्थिक माहिती गोळा करून त्यांच्या खात्यातील रक्कम लुबाडली जात होती. यावेळी पालघर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. तसेच पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number