जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सावधान! बाजारात कॅल्शियमच्या बनावट टॅबलेटकाळाचौकीतून कैलाश फार्मा या कंपनी मधून 75 हजारांचा साठा जप्त केलाय. तुम्ही खरेदी केलेली कॅल्सिमॅक्स 500 टॅबलेट बनावट असू शकते.
बाजारात सध्या कॅल्सिमॅक्स 500 च्या बनावट टॅबलेटची विक्री होत असून अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने नुकत्याच केलेल्या कारवाईतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
काळाचौकी पोलिस ठाण्यात या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच एकाला अटक करण्यात आलीय.
गेले अनेक दिवस कॅल्सिमॅक्स 500 टॅबलेटची विक्री कमी होत होती. एफडीए ला गुप्तवार्ता कडून माहीती मिळाली आणि कैलाश फार्मा वर छापे मारले असतां ७५ हजार रुपयांचे बनावट कॅल्सिमॅक्स टॅब्लेट मिळाले.
मुंबई , ठाणे ,नवी मुंबई मध्ये या टॅबलेटची विक्री झाल्याची शक्यता आहे.