बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे . राज्य मंत्रिमंडळाची सलग दुसऱ्या दिवशी बैठक होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत . राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता ? वर्तवण्यात येत आहे. या बैठकीसाठी आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत आत्ताच आलेल्या माहिती नुसार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील बैठकीसाठी रवाना झाले आहेत. मातोश्रीवरुन मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत.
आजच्या बैठकीत तीन नामांतरांच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणणार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर शिवसेना ठाम आहे. हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणले जाणार आहेत. दरम्यान काल नामांतराचे प्रस्ताव बैठकीत मांडले असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बंडखोर आमदार गोव्यासाठी रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार गोव्यातील ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत.यानंतर सर्व आमदार गुरुवारी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे बहुमत चाचणीसाठी मुंबईत हजर राहतील.गुरुवारी सकाळी ८ वाजता आमदारांना घेऊन विशेष विमान मुंबईकडे रवाना होणार आहेत.